मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं वेगळी छाप उमटवली आहे. लाडका दादूस म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आपल्या भाषेतील खास मालवणी तडक्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांची विनोदाची स्टाइल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ते आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचले. अरुण कदम हे समाजसेवेतही पुढेच असतात. नुकतेच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गरजूंना अन्नदान करताना दिसून येत आहेत.
अरुण कदम यांनी स्वत:च्या हाताने टाटा हॉस्पिटलच्या बाहेरील गरजू पेशेंट्सना अन्नदान केलं. याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर त्यांनी शेअर केला आहे. 'टाटा हॉस्पिटलच्या बाहेर गरजू पेशेंट याना ठाणे व परेल मधील पोलिस मित्र यांच्या तर्फे मोफत जेवण सेवा', असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. अन्नदान सेवेनंतर अरुण कदम यांचा श्री स्वामी समर्थ यांची एक प्रतिमा देऊन सन्मानही करण्यात आला. अन्नदान केल्यानं अरुण कदम यांंचं त्यांचे चाहते कौतुक करत आहेत.
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या हटक्या व्यक्तिमत्वासाठी अभिनेते अरुण कदम हे प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोद, त्याचे टायमिंग आणि अभिनय हे सारं प्रेक्षकांना कमालीचे भावते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कलेच्या बळावपर प्रेक्षकांना आपलंसं केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.