‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्यांची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं.
गौरव मोरे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.गौरवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक दहा वर्षांपूर्वीचा स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. यात गौरव पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतो आहे. विशेष म्हणजे त्यावेळी गौरवचे केसही झुपकेदार नव्हते. २०१२ चा फोटो असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.
अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरवने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. काही दिवसांपूर्वीच तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. गौरवने ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केले आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.