Join us

“अरुणने दिलेल्या ५०० रुपयांमध्ये घर चालवायचे...” वैशाली कदम यांचे आयुष्यातील कठीण काळावर भाष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:10 PM

मराठी अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या अतरंगी स्टाईलने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं.

Arun kadam and Vaishali Kadam Struggling Story : मराठी अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या अतरंगी स्टाईलने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. वेगवेगळ्या कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्ये लाडका दादुस या नावाने प्रसिद्ध झाले आहेत. नुकतीच अरुण कदम यांनी सपत्नीक लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये बोलताना  त्यांची पत्नी वैशाली कदम यांनी त्यांच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगावर भाष्य केलं.

या मुलाखतीत लोकमत फिल्मीशी बोलताना वैशाली कदम यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबतीत काही खुलासे केले. दरम्यान, अरुण कदम यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी कशाप्रकारे दिवस काढले यावर त्यांनी प्रकाश टाकला. तेव्हा त्या म्हणाल्या, "३० वर्षांपूर्वी जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा अरुण ८०० रुपये पगार घरी आणून द्यायचा. साधारणत: १,३६५ रुपयांच्या पगारामध्ये काही कटिंग वगैरे होऊन तो  ८०० रुपये घरी आणायचा. त्याचबरोबर ८०० रुपयांतुनही ५०० रुपये तो मला द्यायचा आणि त्यातून मी घरं चालवायचे". 

पुढे त्या म्हणाल्या, "तरीही खाऊन-पिऊन आम्ही सुखी होतो. अरुणबरोबर लग्न केलं तर मला उद्याची चिंता कधीच नव्हती. उद्या आम्ही काय करणार या गोष्टी मला कधीच जाणवल्या नाही. तेवढा पगार असूनही आम्ही सुखी होतो आणि आजही सुखी आहोत. अजूनपर्यंत आम्हाला खुप अशा अपेक्षा नाही आहेत. मी त्याच्याकडे कधी डिमांड केली नाही, जे आहे ते आहे". 

अभिनेते अरुण कदम सोशल मीडियावर कमालीचे  सक्रिय असतात. त्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते पत्नीबरोबरचे  फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. 

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनमहाजनादेश यात्रा