Join us  

निखिल बनेची काकी करतेय गंभीर आजाराशी सामना, उपचाराचा लाखो रुपये खर्च, चाहत्यांना केलं मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:13 PM

सध्या निखिलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका स्टोरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Nikhil Bane Viral Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या माध्यमातून भांडुपचा निखिल बने घराघरात पोहचला. या शोमुळे त्याला नवी ओळख मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग आणि चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टींमुळे निखिल बने या कलाकाराने चाहत्यांची मनं जिंकली. 'भांडुपचा शशी कपूर' असं नाव त्याला या शोमुळे मिळालं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये निखिलची एक वेगळीच क्रेझ आहे. त्याची विनोदीशैली तसेच अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडतो. सध्या निखिलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका स्टोरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निखिल बने सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचा पाहायला मिळतो. हास्यजत्रेच्या सेटवरील वेगवेगळे फोटो तसेच त्याच्या दैंनंदिन जीवनातील अपडेट्स सोशल मीडियावर तो देत असतो. नुकतीच निखिलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्या स्टोरीच्या आधारे त्याने चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. सोशल प्लॅटफॉर्मवर त्याने चाहत्यांकडे मदतीसाठी हात पुढे केला आहे. 

इन्स्टाग्राम स्टोरीच्या आधारे निखिलने त्याची काकी आजारी असल्याची माहिती दिली आहे. आपल्या काकीच्या उपचाराचा खर्च जास्त असल्यामुळे त्याने चाहत्यांना मदतीची हाक दिली आहे.  त्याच्या या कृतीने नेटकऱ्यांच्या मनात त्याचं स्थान उंचावलं आहे. सोशल मीडियावर निखिलची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. 

निखिलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलंय, "नमस्कार, माझी काकी सुजाता बने एका आजाराशी झुंज देतेय आणि त्यासाठी येणारा खर्च ते पुरवू शकत नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो, जर काही मदत करता आली तर मी खाली लिकं जोडली आहे. शक्य असल्यास मदत करा".  असं लिहून निखिल बनेने चाहत्यांना भावनिक साद घातली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल