छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) आताश: कोण ओळखत नाही? कल्याणची ही छोकरी आता घराघरात पोहोचली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. शिवालीने फारच कमी वेळात हास्यजत्रेत आपलं स्थान निर्माण केलं. व्हॉट्सअॅप लग्न आणि वेक अप या चित्रपटात ती झळकली. हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने तिला खरी ओळख दिली.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी शिवालीला फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिवाली म्हणाली, एका काकू ट्रेनमध्ये भेटलेल्या मला, त्यांनी मला माझ्या फॅमिलीपासून ते नंबरपर्यंत सगळ्या गोष्टी विचारल्या. मला नंबर दे नंबर दे म्हणून मागे लागल्या, मी नाही म्हणत असतानाही त्यांनी माझा नंबर जबरदस्ती घेतला. माझ्यासाठी तो प्रसंग खूप विचित्र होता. त्यानंतर मात्र त्यांनी कधी कॉल करुन त्रास नाही दिला असंही शिवालीने सांगितलं.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये झळकली. ‘हृदयात वाजे समथींगल’ ही तिची पहिली मालिका गाजली आणि त्या नंतर शिवाली ‘बॅक बेंचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.