हास्याचे डबल डोस देण्यासाठी महाराष्ट्राचे मनमुरादपणे मनोरंजन करणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नवीन वर्षात हास्याच्या जत्रेने धमाकेदार एण्ट्री करत प्रेक्षकांना कॉमेडीची डबल ट्रिट देण्यासाठी हा कार्यक्रम चार दिवसांचा केला आहे. तसेच या कार्यक्रमाचे दोन फॉरमॅट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे जजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
'महाराष्ट्राची हास्य जत्रा' पर्व २ या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर-डुपर स्किट्सने महाराष्ट्राला पोट धरुन हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुसऱ्या आठवड्यात 'सेलिब्रेशन' या थीममधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज होणार आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार' या फॉरमॅटमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स ‘सेलिब्रेशन’ या थीमवर आधारित अफलातून स्किट सादर करणार आहेत. मग ते सेलिब्रेशन लग्नाच्या वाढदिवसाचेही असू शकते आणि ऑफिसमधील शेवटचा दिवस असल्याने बॉसला दिलेली सेंड ऑफ पार्टीपण असू शकते.
सेलिब्रेशनचा आनंद कॉमेडीमुळे कसा द्विगुणीत होतो याचे उत्तम उदाहरण पाहण्यासाठी आणि परीक्षक महेश कोठारेंची सेलिब्रेशन स्किटला मिळणारी रिऍक्शन पाहण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- पर्व २’ सोनी मराठीवर पहा.