छोट्या पडद्यावरील अत्यंत लाडका शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या शोप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. हास्यजत्रेतील एक अवलिया नट म्हणजे समीर चौघुले. अफलातून अभिनय आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत समीर चौघुले प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे समीर चौघुलेंच्या चाहत्या वर्गात भर पडली आहे. सध्या समीर चौघुले हास्यजत्रेच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहेत.
हास्यजत्रेच्या दौऱ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ समीर चौघुलेंनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमेरिकेतील लास वेगास शहरातील बॅलेजिओ या हॉटेलमध्ये हास्यजत्रेची टीम थांबली आहे. समीर चौघुलेंनी या हॉटेलचा व्हिडिओ शेअर करत आलिशान रुमची झलक दाखविली आहे. ऐसपैस बेड, खास इंटेरियर असल्याचं समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या हॉटेलच्या खिडकीतून लास वेगास शहराचं दृश्यही दिसत आहे. तसेच आयफिल टॉवरची प्रतिकृतीही चौघुलेंनी शेअर केलेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
अभिनेता नाही तर सिद्धार्थ जाधवला व्हायचं होतं पोलीस, खुलासा करत म्हणाला, "मी एनसीसी..."
चौघुलेंनी शेअर केलेला लक्झरियस रुमच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अमेरिकेतही हास्यजत्रेची क्रेझ पाहायला मिळत आहे. हास्यजत्रेचे अमेरिकेतील शोदेखील हाऊसफूल होत आहेत. अमेरिकेतील प्रेक्षकांकडून हास्यजत्रेतील कलाकारांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.