Join us

"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव

By देवेंद्र जाधव | Updated: February 27, 2025 11:26 IST

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या काळातील डोळ्यात अंजन घालणारं वास्तव सर्वांसमोर मांडलंय (sachin goswami)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार आज घराघरात लोकप्रिय झाले आहेत. ओंकार भोजने, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, शिवाली परब अशा सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. या सर्व कलाकारांना एकत्र आणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची जबाबदारी सांभाळणारे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी (sachin goswami) सध्याच्या विनोदाचं वास्तव समोर ठेवलंय.

सचिन गोस्वामींनी मांडलं सद्यस्थितीमधील विनोदाचं वास्तव

सचिन गोस्वामींनी आगामी 'चिकी चिकी बुबुम बुम' सिनेमाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना सांगितलं की, "विनोदाची स्थिती राजकीय पातळीवर प्रत्येक टप्प्यात अशीच होती. मी गेली ३० वर्ष पाहतोय की, राजकीय नेत्यांना कधीच विनोदाचं वावडं नव्हतं. त्यांच्या अनुयायांनाच जास्त वावडं आहे. अनुयायांचीच निष्ठेची एक स्पर्धा लागली आहे की, माझ्या नेत्याला अमुक बोलल्यावर त्या नेत्याबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठी ते रिअॅक्ट होतात."

"मुळात सर्व राजकीय नेते जे आहेत ना, ते नेहमीच आमच्याशी आपुलकीने आणि मोकळेपणाने वागतात. सर्वच राजकीय पक्षाचे नेते खूप छान वागतात. हास्यजत्रेच्या बाबतीत आमचा अनुभव आहे. पण अनुयायांचं काही सांगता येत नाही." 

"विविध गट जे आहेत ना त्याचं इंटरेस्ट फार सोपे असतात. म्हणजे तुम्ही तो विनोद केला तर तो त्यांना दुखावत नाही. पण तोच विनोद प्रसादने किंवा प्राजक्ताने केला तर त्यांचे इंटरेस्ट असतात की प्राजक्ताकडून माफी मागून घेणे. याशिवाय त्यांना एक बातमीही हवी असते. यामुळे या सर्व गोष्टींमधून विनोद असाच तावुनसुलाखून बाहेर पडलाय. आणि पुढेही असंच होईल. फक्त सावध राहायला लागतं. आम्ही आता सद्यस्थितीत विनोद करतोय म्हणून आम्हाला कठीण वाटतंय. पण याआधी पुलंना सुद्धा हाच त्रास झाला असेल. वपुंना सुद्धा हाच त्रास झाला असेल."

टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजन