Join us

"गण्या धाव रे...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा कोकणातील बाल्या डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:25 IST

हास्यजत्रेतून नावारुपाला आलेल्या निखिल बनेने एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हास्यजत्रेतील कलाकार गणपती डान्स करताना दिसत आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर अभिनय आणि कॉमेडीचं अफलातून समीकरण बांधत प्रेक्षकांना पूरेपूर हसवतात. केवळ हास्यजत्रेतूनच नव्हे तर सोशल मीडियावरही अनेक मजेशीर व्हिडिओ बनवत हे विनोदवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता हास्यजत्रेतील कलाकारांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

हास्यजत्रेतून नावारुपाला आलेल्या निखिल बनेने एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हास्यजत्रेतील कलाकार गणपती डान्स करताना दिसत आहेत. "बघा राधा ही मथुरेच्या बाजाराला चालली" या गाण्यावर हास्यजत्रेच्या या कलाकारांनी बाल्या डान्स केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत निखिल बने, प्रसाद खांडेकर, पृथ्विक प्रताप, ओंकार राऊत, मंदार मांडवकर, रोहित माने हे कलाकार डान्स करताना दिसत आहेत. "गणपती जवळ येतायत तर एक Dance झालाच पाहिजे", असं कॅप्शन या व्हिडिओला निखिलने दिलं आहे. 

हास्यजत्रेतील कलाकारांचा हा बाल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने अनेक  नव्या उभारत्या चेहऱ्यांना संधी देत त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं आहे. ओंकार राऊत, शिवाली परब, पृथ्विक प्रताप, निखिल बने, रोहित माने हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेतापृथ्वीक प्रताप