Join us  

गौरव मोरेने घेतली पुण्याच्या मुरलीधर मोहोळ यांची भेट, म्हणाला, "माननीय खासदार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:28 PM

गौरवने नुकतीच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. अफलातून विनोदबुद्धी आणि अभिनयाच्या जोरावर गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. गौरवचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही गौरव चाहत्यांना देत असतो. 

गौरवने नुकतीच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "माननीय,खासदार: मुरलीधर(अण्णा) मोहोळ...नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री ह्यांची सदिच्छा भेट...", असं कॅप्शन गौरवने या फोटोला दिलं आहे. गौरवची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धीझोतात आलेला गौरव सध्या 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गौरवने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याचा 'अल्याड पल्याड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

दरम्यान, मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव करत ते निवडूण आले. मोदींच्या शपथविधीदिनी शपथ घेत मुरलीधर मोहोळ यांनी  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला.  

टॅग्स :मुरलीधर मोहोळटिव्ही कलाकारमराठी अभिनेता