Join us

'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

By कोमल खांबे | Updated: April 21, 2025 10:13 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी "नटीने मारली मिठी" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. दिवसेंदिवस सोशल मीडियावरचा ट्रेंडही बदलत चालला आहे.  आता "नटीने मारली मिठी" हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ समोर आले आहेत. या गाण्यावरची हुक स्टेपही प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक कलाकारांनाही या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारही या गाण्यावर थिरकले आहेत. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी "नटीने मारली मिठी" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रसाद खांडेकरसोबत नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रशमेश शिवलकर हे कलाकारही दिसत आहेत. प्रसादच्या थेट तुमच्या घरातून या नाटकाची टीमही या व्हिडिओत डान्स करताना दिसत आहे. "Fun in konkan...संपूर्ण बॅकस्टेज टीमसोबत एक रील तर बनता है...थेट तुमच्या घरातून चा यशस्वी हाऊसफूल दौरा चालूच आहे थाटामाटात, नक्की या तुमच्या जवळच्या नाट्यगृहात", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. 

प्रसाद खांडेकरचं दिग्दर्शन असलेल्या थेट तुमच्या घरातून या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचं लेखनही प्रसादनेच केलं आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, भाग्यश्री मिलिंद, भक्ती देसाई, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर हे कलाकार आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेतानम्रता आवटे संभेराव