Join us

विकी कौशलच्या "तौबा तौबा"वर डान्स करत होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीला पाहून कुत्र्याने केलं असं काही, आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 4:48 PM

नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे.  

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचं 'तौबा तौबा' हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे. प्रदर्शित होताच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यातील विकीच्या डान्सचं आणि त्याच्या हुक स्टेपचं प्रचंड कौतुक होत आहे. 'तौबा तौबा' गाण्यावर अनेकांनी रील्सही बनवल्या आहेत. अनेक सेलिब्रिटीही विकी कौशलच्या या गाण्यावर थिरकले आहेत. मराठमोळी अभिनेत्री नम्रता संभेरावलाही 'तौबा तौबा' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. 

नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये अभिनेत्री 'तौबा तौबा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण, नम्रताने विकी कौशलची हुक स्टेप करताच तिच्या मागे असलेला कुत्रा मात्र घाबरून पळ काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ते पाहून नम्रतालाही हसू आवरेनासं झालं आहे. 

"तौबा तौबा परत नाही नाचणार", असं म्हणत नम्रताने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. नम्रताचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनाही हसू आवरता आलेलं नाही. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून नम्रता घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय आणि विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या नम्रताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या नाच गं घुमा या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं. 

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार