Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:22 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने बांधलं नवीन घर, म्हणते - "आमचं शेतीघर..."

नम्रता संभेराव ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतलेल्या नम्रताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. उत्तम अभिनय आणि अचूक टायमिंग साधत नम्रता विनोद निर्मिती करून प्रेक्षकांना खळखळवून हसवते. नम्रताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही नम्रता चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. 

अथक परिश्रम करून टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावणाऱ्या नम्रताची स्वप्नपूर्ती झाली आहे. नम्रताने शेतात नवीन घर बांधलं आहे. नुकतंच या नवीन घराची पूजा पार पडली. याचे फोटो नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत नम्रताने स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हटलं आहे. "गणपती बाप्पा मोरया...आमचं शेतीघर...विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि प्रेमाने त्या सोप्या होतात", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. नम्रताने फोटोमधून तिच्या शेतातील टुमदार बंगल्याची झलक दाखवली आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, नम्रताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच 'नाच गं घुमा' या सिनेमात नम्रता दिसली होती. या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमातील नम्रताच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कामिगिरी केली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारनम्रता आवटे संभेराव