Join us

"असेच एकमेकांना सांभाळून...", दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:36 IST

पत्नीबरोबरचे काही फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दत्तूच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला खास पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता दत्तू मोरे घराघरात पोहोचला. इतर नवोदित कलाकारांप्रमाणेच दत्तूलाही या शोने लोकप्रियता मिळवून दिली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या दत्तूने मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात त्याची ओळख बनवली. अफलातून अभिनय आणि कॉमेडीने दत्तू प्रेक्षकांना पोट धरून हसवतो. दत्तू सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांना देत असतो. 

दत्तूने त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. पत्नीबरोबरचे काही फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दत्तूच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला खास पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...असेच छान राहू आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ...I love you so much...उम्म्मम गिफ्ट? लवकरच", असं दत्तूने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती असं आहे. स्वाती ही पेशाने डॉक्टर आहे. ती स्त्री रोग आणि प्रसुतीतज्ञ आहे. काही दिवसांपूर्वीच स्वातीने तिचं स्वत:चं क्लिनिक सुरू केलं आहे. ठाण्यात स्वातीचं घुनागे क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर आहे. दत्तू अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतो. 

दत्तू आणि स्वातीने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्न केलं होतं. कोर्ट मॅरेज करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं होतं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला हास्यजत्रेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. प्री वेडिंगचे फोटो पोस्ट करत दत्तूने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता