Join us  

"निशाणा तुला दिसला ना...", स्विमिंगपूलमध्ये गौरव मोरे आणि निखिल बनेचा डान्स, व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:11 PM

गौरव आणि निखिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते स्विमिंगपूलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि अभिनेता निखिल बने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचले. टॅलेंट आणि मेहनतीच्या जोराव त्यांनी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव आणि बनेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनयाची जाण असणाऱ्या गौरव आणि बनेला सिनेमात झळकण्याचीही संधी मिळाली होती. 'बॉइज ४' या सिनेमात निखिल बने आणि गौरव मोरे एकत्र झळकले होते. 

गौरव आणि निखिलचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. गौरव आणि निखिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते स्विमिंगपूलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. 'निशाणा तुला दिसला ना' या गाण्यावर गौरव आणि निखिलने डान्स केला आहे. या व्हिडिओत त्यांच्याबरोबर 'बॉइज ४' सिनेमाची टीमही दिसत आहे. अभिनेता पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड हेदेखील त्यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहेत. 

गौरव आणि निखिलचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.निखिल स्विमिंगपूलमध्ये तर गौरव स्विमिंगपूलच्या कट्ट्यावर उभा राहून याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे.  या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, सध्या गौरव 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तर निखिल बने एका युट्यूब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'बॉईज ४' सिनेमात निखिल आणि गौरवने काम केलं होतं. या सिनेमात ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता