Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. गौरव मोरे हे नाव आता फक्त मराठीपुरत मर्यादित न राहता हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौरवने वैयक्तिक आयुष्यात असंख्य संकटांना तोंड देत हा पल्ला गाठला आहे. दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर केला. गौरवने नुकतीच स्वप्नपूर्ती झाली आहे. अभिनेत्याने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेता गौरव मोरेने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. त्याने 'skoda kylaq' कार खरेदी केली आहे. याची किंमत सुमारे १४ लाखांच्या घरात आहे. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर शुभम गणपती मंदिरात गेला होता. नव्या गाडीचे फोटो त्याने शेअर केले आहेत. "फायनली नवीन गाडी घेतली...", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
गौरव मोरेने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे अभिनेत्यांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याशिवाय वेगवेगळे मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारुन गौरव मोरेने स्वत:ला सिद्ध केलं आहे.