‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MaharashtraChi Hasya Jatra) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे निखील बने (Nikhil Bane). एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आलेल्या या विनोदवीराने आज अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, आजही त्याच्यातील साधेपणा प्रेक्षकांना भावतो. निखील आजही मुंबईतील चाळीत राहत असून त्याने त्याच्या चाळीतलं जग कसं आहे हे व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे.
निखील सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळेच प्रोफेशनल लाइफसोबत तो पर्सनल आयुष्यातील गोष्टीही कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ निखीलने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोहर चाळीतीच त्याचे काही मित्र दिसत आहे.
पावसाची चाहूल लागताच लोक छत्री, रेनकोट खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतात. चाळीत राहणारे लोक पावसाच्या आधी घरावर ताडपत्री टाकायचं काम करतात. निखिलही त्याच्या मित्रांच्या मदतीने घराच्या पत्र्यावर ताडपत्री टाकण्याचं काम करतोय. याचाच व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
निखिलच्या या व्हिडीओ चाहत्यांसह सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहे. एकाने लिहिले, चाळीतील मज्जा वेगळीच असते. दुसऱ्या एकाने लिहिले, हे ही दिवस जातील, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले, आपणा टाइम आयेगा......भाई टेंशन ना ले.....एक दिवस हेच मित्र तुझ्या घरातील टेरेस वर पार्टी करत असतील.
https://www.instagram.com/reel/CtomapZgl1-/?utm_source=ig_embed&ig_rid=c387fc41-fd92-48b5-ac4a-6b1563740ffe
दरम्यान, निखील भांडूपमध्ये एका चाळीत राहत असून त्याने मोठा स्ट्रगल केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीही त्याने अनेक लहानमोठी काम केलं आहेत. यात खासकरुन त्याने अनेकदा बॅक स्टेजलाही काम केलं आहे. त्यातूनच त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची ऑफर मिळाली.