‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra ) या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshani Indalkar ) आणि 'दादरचा अमोल पालेकर' अशी ओळख असलेला अभिनेता ओंकार राऊत (Onkar Raut ) यांच्या एका फोटोची बरीच चर्चा झाली होती. होय, वनिता खरातच्या लग्नातील हा फोटो समोर येतात प्रियदर्शनी व ओंकार यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. प्रियदर्शनी ओंकारच्या छातीवर हात ठेवून पोझ देतेय तर ओंकार तिच्याकडे प्रेमाने बघतोय, अशा या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. अर्थात यानंतर आमच्या दोघांत काहीही नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं प्रियदर्शनीने स्पष्ट केलं होतं. आता काय तर प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा सिनेमा काल बुधवारी रिलीज झालाये आणि या निमित्ताने ओंकारने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील एका हॅशटॅगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.‘फुलराणी’च्या प्रिमीअरला ओंकार हजर होता. या इव्हेंटचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. सोबत प्रियदर्शनीसाठी एक खास पोस्टही लिहिली आहे.
ओंकारची पोस्ट अन् हॅशटॅग
“अभिनंदन आणि शुभेच्छा प्रियदर्शनी..., तू खरंच खूपच छान काम केलं आहेस! सुबोध भावे आणि विक्रम गोखले यांच्याबरोबर उभं राहणं, अभिनय करणं हे सोपं नाही. पण तू ते लीलया पार पाडलं आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे आणि आनंदही. असाच प्रत्येक क्षणांचा आनंद घे !! सगळ्यांनी फुलराणी चित्रपट गृहात जाऊन पहा!! P.S. : तू विक्रम गोखल्यांसोबत balldance केलास! और क्या चाहीये!!”, अशी पोस्ट ओंकार राऊतने केली. या पोस्टमध्ये “फुलराणी, झाली ब्यूटी फुलराणी, झगामगा आणि मला बघा, शेवंता तांडेल, थ्री टाईम ब्यूटी क्वीन, मिस कोलिवाडा, नो कॉन्ट्रोवर्सी प्लीझ” असे हॅशटॅग ओंकार राऊतने दिलेत.यातील #nocontroversiesplease या हॅशटॅगने सर्वांचंच लक्ष वेधले.
प्रियर्दशनीनेही ओंकार राऊतच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना या हॅशटॅगचा उल्लेख केला. “खूप खूप धन्यवाद!! PS – हे screen वर बघताना मलाही विश्वास बसत नव्हता! आणि हो, last hashtag महत्वाचा..!” असे तिने कमेंट करताना लिहिलं.
आमच्यात काहीही नाहीये. तेव्हा प्लीज, कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करू नका, असं आवाहन एकप्रकारे ओंकारने केलं आणि प्रियदर्शनीने त्यास दुजोरा दिला. एकंदर काय तर आम्ही मित्र आहोत, यापेक्षा जास्त आमच्यात काहीही नाही, हे पुन्हा एकदा ओंकार व प्रियदर्शनी यांनी स्पष्ट केलं.