Join us

सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, "पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:51 PM

एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नाटकापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या प्रसादचा पहिला वहिला 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन त्याने केलं आहे. हास्यजत्रेतील कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे. एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं. 

प्रसाद खांडेकरने लग्नाच्या दहाव्या वाढदिवशी पत्नी अल्पाला स्कूटी गिफ्ट केली आहे. प्रसादने दिलेलं हे सरप्राइज पाहून त्याच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रसादने याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा...पहिली एकांकिका ते पहिला सिनेमा ह्या संपुर्ण प्रवासात सोबत आहेस ...तुझ्या संगतीशिवाय शिवाय हे अजिबात शक्य नव्हतं आणि शक्य होणारही नाही. आज लग्नाचा दहावा वाढदिवस अजून खूप दशक पार करायचीत...बाकी माझी तब्येत माझं शेड्युल या बाबतीतील तुझी तक्रार लवकरच सोडवेन.तुला नेहमी मी सरप्राईज द्यावं असं वाटतं. पण, मला एवढं कोळून प्यायली आहेस की मी काय सरप्राईज देणार आहे हे तू आधीच ओळखतेस. त्यामुळे ते सरप्राईज राहतच नाही. पण मला खात्री आहे आजचं हे स्पेशल सरप्राईज तू नक्कीच guess केलं नसशील . हा आंनद आणि हे प्रेम असंच वाढत राहू दे . अप्पू...शेवटी माझं आवडतं गाणं तुझ्यासाठी

"आपकी मंज़िल हूँ मैंमेरी मंज़िल आप हैंक्यों मैं तूफाँ से डरूँमेरा साहिल आप हैंकोई तूफानों से कह देमिल गया साहिल मुझे"

प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.  प्रसादच्या 'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडीत, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, रोहित माने, वनिता खरात, भाऊ कदम या कलाकारांच्या मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता