Join us

फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:20 IST

Marathi actor: तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला?

प्रत्येकाकडे जुन्या आठवणींचा एक कप्पा असतो आणि यात असंख्य आठवणी दडवून ठेवलेल्या असतात. असेच आठवणींचे कप्पे सेलिब्रिटींकडेही पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय होतोय. अलिकडेच या कार्यक्रमातील कलाकार मंडळींनी विदेश दौरा केला. तेव्हापासून त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. यामध्येच या कार्यक्रमातील एका अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून तो नेमका कोणता अभिनेता आहे? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हा अभिनेता त्याच्या आईसोबत बसला आहे. मदर्स डे निमित्त त्याने हा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे हा फोटो पाहून अनेक जण त्याला ओळखण्यास अयशस्वी ठरले. आईला बिलगून बसलेला हा मुलगा साधासुद्धा नसून अभिनेता, विनोदवीर समीर चौगुले आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये या अभिनेत्याची कमालीची चर्चा रंगला आहे. अलिकडेच समीरने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आईशी निगडीत असलेला भावूक किस्सा सांगितला. एकीकडे आईचं निधन झालेलं असताना समीरला नाटकाचा प्रयोग करावा लागला होता, असं त्याने सांगितलं. 

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटी