Join us

'डान्स प्लस 5' विजेता रुपेश बनेसोबत रोमॅण्टिक झाली शिवाली; डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 13:25 IST

Shivali parab: शिवाली आणि रुपेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एकाच चर्चेला उधाण आलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (shivali parab). उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधण्याची कसब यांच्या जोरावर ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. सोशल मीडियावरही तिचा सक्रीय वावर आहे. त्यामुळे तिचे ट्रेंडिंग रिल्स किंवा व्हिडीओ क्षणार्थात व्हायरल होतात. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर शिवालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये तिने डान्स प्लसच्या ५ व्या पर्वाचा विजेता रुपेश बने याच्यासोबत रोमॅण्टिक डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शिवाली आणि रुपेशने वेद शर्माच्या ‘Lofi Love’ गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. यावेळी दोघांनी सेम कलरचं ट्युनिंग केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केली आहे. 

दरम्यान, नुकताच शिवालीने तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे तिने स्वत:च्या हक्काचं नवीन घर खरेदी केलं असून या नव्या घरात तिने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे ती चर्चेत आहे. इतकंच नाही तर गेल्या काही काळत ती अनेक म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रा