Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 16:48 IST

Shivali Parab : शिवाली परबचा मे महिन्यात वाढदिवस असून यानिमित्ताने तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एका मुलाखतीत तिने घर घेतल्याचे सांगितले.

छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (Shivali Parab). सध्याच्या घडीला तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करते आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच शिवालीचे हार्टबीट वाढणार हाय हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

शिवाली परबचा मे महिन्यात वाढदिवस असून यानिमित्ताने तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच तिने मीडिया टॉल्कला दिलेल्या मुलाखतीत तिने घर घेतल्याचे सांगितले. तिला तिच्या वाढदिवसासाठी काय तयारी करणार याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली की, यंदा वाढदिवसासाठी असे फार काही स्पेशल नाही. ही गोष्ट अजून मी कुठेच सांगितलेली नाही. पण, आता सांगते…मी घर घेतले आहे. या नवीन घराची पूजा मी १० तारखेला ठेवलेली आहे. हे सर्व नक्कीच प्रेक्षकांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे. शिवाली परबच्या नवीन घराची पूजा मे महिन्यात १० तारखेला होणार आहे. 

वर्कफ्रंट

शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये येण्यापूर्वी अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींग’ या मालिकेमध्ये काम केले आणि त्यानंतर ती ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.  

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा