Join us

'लग्नापूर्वी माझं अफेअर होतं'; वनिता खरातने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:08 IST

Vanita kharat: अलिकडेच वनिताने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वैवाहिक जीवनासोबतच लग्नापूर्वीच्या अफेअर्सवर भाष्य केलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात ( vanita kharat) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. उत्तम अभिनयासह बिंधास्त स्वभावामुळे वनिता कायमच चर्चेत येत असते. २ फेब्रुवारी रोजी वनिताने प्रियकर सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून वनिताच्या वैवाहिक जीवनाची चर्चा होताना दिसते. यामध्येच आता वनिताने तिच्या लग्नापूर्वीच्या अफेअर्सवर भाष्य केलं आहे. तिने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

अलिकडेच वनिताने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वैवाहिक जीवनासोबतच लग्नापूर्वीच्या अफेअर्सवर भाष्य केलं. तसंच सुमितसोबत लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला हेदेखील सांगितलं.

“लग्नाआधी माझे अफेअर्स होते. त्यामुळे आता पुढे अफेअर्स करायचे नाहीत असं मी ठरवलं होतं. पण, सोबतच अफेअर करायचं नाही म्हणजे मग लगेच लग्न करुन टाकायचं या मताचीही मी नव्हते. कारण, यापूर्वी मी फार अनुभव घेतले आहेत. सुमित आणि माझं लग्न करायचं ठरलं. त्यानंतर मग आम्ही फायनल डिसीजनवर पोहोचलो, असं वनिता म्हणाली.

दरम्यान, वनिता कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसून येते. काही महिन्यांपूर्वी सुमितबरोबरचा फोटो शेअर करत तिने तिच्या नात्याची कबुली दिली होती. 

टॅग्स :वनिता खरातसेलिब्रिटीटेलिव्हिजन