Maharashtrachi Hasya Jatra fame Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो सर्वांना खळखळून हसवणारा शो. पण सध्या या शोची नाही तर चर्चा आहे ती ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ची. अर्थात अभिनेत्री शिवाली परब हिची. शोमधील छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ओळखली जाणारी शिवाली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. सध्या तिचे असेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण बातमी इतकीच नाही. खरी बातमी पुढे आहे. होय, शिवालीच्या या फोटोंवर एका चाहत्यानं केलेली कमेंट आणि त्याला शिवालीने दिलेलं उत्तर ही खरी बातमी आहे.
शिवालीले वेस्टर्न ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या ड्रेससोबत तिने घातलेली ज्वेलरी आणि तिचा मेकअप एकदम हटके आहे. काहींना शिवालीचा हा लुक प्रचंड आवडला. पण काहींनी मात्र यावरून शिवालीला ट्रोल करायला सुरूवात केली. एका युजरने शिवालीच्या मेकअपवर खोचक टीप्पणी केली. मग काय, या युजरला शिवालीने लगेच सणसणीत उत्तर दिलं.
“मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिल्याचे परिणाम” असं या युजरने शिवालीच्या फोटोंवर कमेंट करत लिहिलं. शिवालीची नजर या कमेंटवर पडली आणि तिने लगेच या युजरला उत्तर दिलं. “माझा मेकअप मीच करते. त्यामुळे काळजी नको”, असं तिने लिहिलं. शिवालीचा जन्म 10 मे 1998 ला झाला. शिवालीचं संपूर्ण शिक्षण कल्याण मधील श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये झालं. शाळेत असल्यापासून तिला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींगल’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. एकदा मराठी अभिनेत्री नम्रता आवटे यांनी शिवालीला एका कार्यक्रमात पाहिलं आणि आणि त्यांनीच तिला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मध्ये बोलावलं. शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रे’मुळे चुलबुल पांडे म्हणून नवीन ओळख मिळाली. शिवाली स्टेजवर आल्या आल्या हास्याचे कारंजे उडतात, हेच तिचं यश आहे.