छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिची शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 5)च्या पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच नव्या सीझनची घोषणा करण्यात आली. मात्र यंदाच्या सीझनमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हा बदल म्हणजे या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार नसून त्यांच्याजागी अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) दिसणार आहे. काही जण रितेश शो होस्ट करणार म्हणून उत्सुक आहेत तर मांजरेकरांनी शो का सोडला, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान, आता त्यांनी शो सोडण्यामागचे कारण समोर आले आहे. खुद्द त्यांनीच हे कारण सांगितले आहे.
खरेतर बिग बॉस मराठी शोच्या पाचव्या सीझनचा प्रोमो समोर आल्यानंतर महेश मांजरेकर यांच्या जागी रितेश देशमुख शो होस्ट करताना दिसणार असल्याचे समोर आले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी शो का सोडला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता या मागचं कारण समोर आलं आहे. महेश मांजरेकरांनी त्यांच्या काही आगामी प्रोजेक्टमुळे हा निर्णय घेतला आहे.
महेश मांजरेकर आगामी प्रोजेक्टमध्ये आहेत व्यग्र
महेश मांजरेकर म्हणाले की, सध्या मी मणिरत्नम यांचा 'ठग लाइफ' हा चित्रपट करतो आहे. तसेच एका कन्नड चित्रपटाचेही काम सुरू आहे. या चित्रपटाचं दिल्ली, लंडन आणि बँकॉकमध्ये शूटिंग पार पडत आहे. त्यासाठी मी दोन ते तीन महिने बाहेर असणार आहेत. याव्यतिरिक्त मनात काही विषय घोळत आहेत. हे काम संपल्यानंतर माझ्या कलाकृतींवरील काम सुरू करणार आहे.
बिग बॉस मराठी ५बद्दल
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा प्रोमो समोर आला असला तरी त्याच्या प्रसारीत होण्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र नवा सीझन आणि नव्या होस्टसोबत या शोमध्ये कोण स्पर्धक पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.