Join us

‘माझा होशील ना’च्या आदित्यची ‘लयभारी’ पोस्ट; फोटो नाही कॅप्शन बघा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:40 AM

Virajas Kulkarni New Look: मालिकेत सईची भूमिका गौतमी देशपांडेने साकारली होती तर आदित्यची भूमिका विराजस कुलकर्णीने वठवली होती. तूर्तास विराजसची एक पोस्ट चर्चेत आहे.

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’  (Majha Hoshil Na )  या गाजलेल्या मालिकेने कधीच निरोप घेतला. पण या मालिकेतील कलाकार, त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. सई आणि सर्वांचा लाडका आदित्य यांना प्रेक्षक अद्यापही विसरलेले नाहीत. तुम्हाला ठाऊक आहेच की, मालिकेत सईची भूमिका गौतमी देशपांडेने साकारली होती तर आदित्यची भूमिका विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) वठवली होती. तूर्तास विराजसची एक पोस्ट चर्चेत आहे.होय, सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या विराजसने इन्स्टाग्रामवर त्याचा एक नवा लुक शेअर केला आहे. पण त्याच्या या नव्या लुकपेक्षा या पोस्टला त्याने दिलेलं कॅप्शन भारी आहे.

विराजसने तीन फोटो शेअर केले आहेत. यात त्याने  त्याने पिच रंगाचा वेस्टर्न कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. त्याचा हा कुर्ता एका बाजूने क्रॉप आहे. यावरच त्याचं कॅप्शन आहे. ‘ कापड कमी पडलं का... , असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘ कापड शिवणाऱ्याने कापड ढापलं की काय..,, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. सगळं तुम्हीच म्हणाल तर आम्ही काय म्हणायचं, अशी कमेंट अन्य एका युजरने केला आहे.  कशाला असली कपडे घालायची? असा प्रश्न एका युजरने केला आहे. अरे ती फॅशन आहे, अशी कमेंट एकाने केली आहे.

विराजस कुलकर्णी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ‘माझा होशील ना’नंतर विराजस कोणत्या नव्या प्रोजक्टेमध्ये दिसला नाही. मात्र विराजय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबतचं नातं त्याने अधिकृत केलं होतं.   

टॅग्स :मृणाल कुलकर्णीटेलिव्हिजन