Join us

 माझा होशील ना...! विराजस कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टने वाढवले चाहत्यांचे ‘टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:55 AM

Majha Hoshil Na : प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच....; विराजस कुलकर्णी सोडणार मालिका?

ठळक मुद्दे‘माझा होशील ना’ या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘माझा होशील ना’ ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. काल मालिकेचा एक व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांना धक्का बसला. पाठोपाठ मालिकेतील आदित्य अर्थात विराजस कुलकर्णी याच्या पोस्टने चाहते हैराण झालेत.होय, या व्हिडीओत आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो, असे दाखवले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला आणि यानंतर विराजसने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हाच व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली. त्याची ती पोस्ट वाचून विराजस ही मालिका सोडतोय की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

‘प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे,’ असे विराजसने या पोस्टमध्ये म्हटलेय.

इतकेच नाही तर सई अर्थात गौतमी देशपांडे हिनेही असाच एक फोटो शेअर करत कन्फ्युज चाहत्यांना आणखी कन्फ्युज केले. ‘वटपोर्णिमा आणि अशी’, असे कॅप्शन देत तिने एक फोटो शेअर केला. यात सईच्या हातात पिस्तूल आहे आणि ती डोळे गच्च मिटून गोळी झाडण्याच्या तयारीत दिसतेय. त्यामुळे खरंच आदित्यचा मृत्यू होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आदित्यचा मृत्यू म्हणजे, त्याचे पात्र मालिकेतुन संपणार तर नाही ना? असा सवालही प्रेक्षक विचारत आहेत. आता याचे उत्तर येणा-या एपिसोडध्ये मिळतीलच.‘माझा होशील ना’ या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले होते.  या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.   विराजस कुलकर्णी हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले होते. 

 

टॅग्स :झी मराठीमृणाल कुलकर्णीटेलिव्हिजन