Join us

माझा होशील ना मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे सिल्व्हासामध्ये, सेटवर अशी सुरू आहे धमाल मस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:05 PM

माझा होशील ना या मालिकेच्या सेटवर नुकतीच आमरस पार्टी करण्यात आली. आमरसाचा सगळ्यांनीच मनसोक्त आस्वाद घेतला.

ठळक मुद्देविराजस आणि गौतमीच्या फॅन क्लबवर हे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत.

माझा होशील ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रातील चित्रीकरण बंद असून अनेक हिंदी आणि मराठी मालिका महाराष्ट्राच्या बाहेर चित्रीकरण करत आहेत. माझा होशील ना या मालिकेचे चित्रीकरण सध्या सिल्व्हासा येथे सुरू असून चित्रीकरणामुळे गेल्या महिन्याभरापासून कलाकार आपल्या घरापासून दूर आहेत. कलाकार आणि तत्रंज्ञ आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने एकमेकांची काळजी घेत चित्रीकरण करत आहेत. तसेच चित्रीकरणाच्यावेळी धमाल मस्ती देखील करत आहेत. 

माझा होशील ना या मालिकेच्या सेटवर नुकतीच आमरस पार्टी करण्यात आली. आमरसाचा सगळ्यांनीच मनसोक्त आस्वाद घेतला. घरापासून लांब असूनही आमरस खाता आल्याने सगळेच प्रचंड खूश होते. 

माझा होशील ना या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. माझा होशील ना या मालिकेतील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेतील नायक विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.

टॅग्स :झी मराठी