माझी तुझी रेशीमगाठ: चौधरी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन; मिथीलाने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:13 PM2022-08-21T17:13:01+5:302022-08-21T17:13:22+5:30

Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मिथीला आणि विश्वजीत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं घरातल्यांना सांगतात.

Majhi Tuchi Reshimgath A new guest will arrive in the Chaudhary family | माझी तुझी रेशीमगाठ: चौधरी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन; मिथीलाने दिली गुडन्यूज

माझी तुझी रेशीमगाठ: चौधरी कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन; मिथीलाने दिली गुडन्यूज

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ'  (mazi tuzi reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नेहाच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य यशसमोर आलं आहे. तर, दुसरीकडे चौधरी कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामुळे एकीकडे सुख आणि दुसरीकडे दु:ख अशा दोन्ही परिस्थिती चौधरी कुटुंबात निर्माण झाल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मिथीला आणि विश्वजीत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं घरातल्यांना सांगतात. त्यामुळे सध्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मिथीला आणि विश्वजीत यांचं केवळ नावापुरतं लग्न झालं होतं. मात्र, नेहाच्या येण्यामुळे या दोघांमधील मतभेद, गैरसमज दूर झाले. त्यामुळेच ही जोडी खऱ्या अर्थाने पती-पत्नीप्रमाणे राहू लागले.

दरम्यान, आतापर्यंत चौधरींच्या घरात केवळ परी लहान होती. मात्र, आता आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. मात्र, या आनंदाच्या प्रसंगी नेहाच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य चौधरी कुटुंबाच्या समोर आलं तर काय होईल? नेहा आणि परीला हे घर सोडून जावं लागेल का? यश कोणता निर्णय घेईल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Majhi Tuchi Reshimgath A new guest will arrive in the Chaudhary family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.