Join us

माझ्या नवऱ्याची बायकोमधील या कलाकाराला झाली मुलगी, हटके पद्धतीने केले बारसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 2:15 PM

बारशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देसचिनला नुकतीच मुलगी झाली असून त्याने आपल्या मुलीचे बारसे हटक्या पद्धतीने केले आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेत सचिन देशपांडे आपल्याला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. सचिनला नुकतीच मुलगी झाली असून त्याने आपल्या मुलीचे बारसे हटक्या पद्धतीने केले आहे.

Happy Valentine's Day to all the Lovely Ppl.

Posted by Sachin Deshpande on Saturday, February 13, 2021

सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने कोणत्याही समारंभाला जास्त लोकांना बोलवणे शक्य होत नाहीये. त्यामुळे सचिनने घरातल्या घरात आपल्या मुलीचे बारसे केले असून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी सांगत आहे की, अनेकांना तिच्या बारशाला यायची इच्छा होती. पण बारशाला सगळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे तिचे नाव मीरा असल्याचे या व्हिडिओद्वारे ती सांगत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ सचिनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर करून त्यासोबत लिहिले आहे की, सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत, म्हणूनच आमच्या मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वाद ही नक्की द्या.

24 डिसेंबर 2020, गुरुवार ची सकाळ आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहेऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो....

Posted by Sachin Deshpande on Saturday, January 23, 2021

सचिनला 24 डिसेंबरला मुलगी झाली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली होती. या गुड न्यूजमध्ये त्याने लिहिले होते की, गुरुवार ची सकाळ... आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. काय होईल ह्याचा उत्साह होता तर सगळं नीट होईल ना ह्याची काळजी होती. तसं बघितलं तर पियुषा आणि माझ्या बाबतीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारी च घडल्या आहेत. मग आमचा साखरपुडा असो, आमचं लग्न असो सगळं गुरुवारीच...पण हा गुरुवार जरा खास होता, खासच होता कारण ह्या गुरुवारी आमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडणार होती, आम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती आयुष्यात येणार होती. जवळपास अर्धा तास उलटून गेला होता पियुषाला ऑपरेशन रूम मध्ये नेऊन आणि माझे पेशन्स संपायला लागले होते. कधी कळणार कधी कळणार असं सारखं मनात व्हायला लागलं होतं आणि तेव्हढ्यात क्यां क्यां असा रडण्याचा आवाज ऑपरेशन रूम मधून आला, काय झालंय मुलगा की मुलगी? हे ऐकण्याच्या आधीच मी रडण्याचा आवाज ऐकून उड्या मारायला लागलो होतो. मी उड्या मारत असतानाच डॉक्टर आले आणि म्हणाले अभिनंदन "मुलगी झाली", मी सांगूच शकत नाही की हे ऐकून मनात नक्की काय झालं होतं. पराकोटीचा आनंद काय असतो हे कदाचित शब्दात मांडता येत नसावं ते नुसतच अनुभवावं आणि तो अनुभव मी त्या क्षणी घेत होतो. डॉक्टरांनी बाळाला आमच्याकडे दिलं आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं. चेहेऱ्यावर खूप हसू, नुसतं उड्या मारणं आणि मनातून खूप भरून येणं असं सगळंच एकत्र मी करत होतो. हळू हळू जरा शांत झालो आणि मग बाळाला हातात घेतलं. सचिन ते सचिन बाबा असा एक प्रवास पूर्ण झाला होता. बाप माणूस झालो होतो... पण पियुषा अजून आत होती, सिझेरियन झाल्यामुळे तिला वेळ लागणार होता आणि तिला थँक यू म्हणण्यासाठी मी आतुर झालो होतो. मग जवळ पास एका तासाने पियुषाला आत आणलं, खरंतर तिला घट्ट मिठी मारायची होती पण सिझेरियन झाल्यामुळे ते शक्य नव्हत. जितका वेळ शक्य होईल तेवढं तिलाथँक यू  म्हणालो. दोघे ही खुप रडलो त्यादिवशी आणि त्या दिवसापासून आज पर्यंत रोज तिला थँक यू म्हणातोय. आमच्या बाळाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे, आज तिचा तसा एक महिन्याचा वाढदिवस आहे... मला आयुष्यभर पुरेल असा आनंद दिल्याबद्दल पियुषा तुला खूप खुप थँक यू आणि आमच्या बाळाला पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...मुलगी झाली होहोहो

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको