Join us

सचित करतोय... पैसा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2016 9:49 AM

        माणसाच्या आयुष्यात काहीवेळा पैसा इतका इम्पॉरटन्ट ठरतो कि त्या पैशासाठी तो काहीही करु शकतो. असच ...

        माणसाच्या आयुष्यात काहीवेळा पैसा इतका इम्पॉरटन्ट ठरतो कि त्या पैशासाठी तो काहीही करु शकतो. असच काही झालय गुडलुकिंग बॉय सचित पाटिल याच्यासोबत. सचित सध्या पैसा पैसा करीत आहे. आता सचितला एवढी काय अडचण आलीय कि तो पैसा पैसा करतोय असे वाटत असेल तर तो चुकिचा समज आहे. सचित सध्या पैसा पैसा नावाचा एक सिनेमा करीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील आणि स्पृहा जोशी या जोडीची केमिस्ट्री प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.        सीएनएक्सशी बोलताना सचित म्हणाला, पैसा पैसा ही फक्त एका दिवसाची गोष्ट आहे. पैशांमुळे बदलणारी नाती आणि त्यामुळे खºया माणसांची होणारी ओळख या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. दहा हजार रुपयांसाठी नायकाला करावे लागणारे स्ट्रगल या सिनेमात दाखविले आहे. स्पृहा सोबत मोठ्या पडद्यावर प्रथमच काम करीत आहे आणि आमचा एक्सपिरियन्स तर भन्नाटच होता असे सचित सांगतोय. अवधुत गुप्ते. शेखर आणि निधी मोहन यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आता पाहुयात सचितचा पैसा पैसा बॉक्स आॅफिसवर किती पैसा जमवतोय.