तर अशा रितीने ‘छैंय्या छैंय्या’ गाणे झाले होते चित्रीत, तब्बल 21 वर्षांनंतर मलायकाने सांगितले खास किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 06:00 AM2019-07-27T06:00:00+5:302019-07-27T06:00:00+5:30

करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस आणि भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तारने या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून ...

Malaika Arora spills the beans on her iconic song Chaiya Chaiya | तर अशा रितीने ‘छैंय्या छैंय्या’ गाणे झाले होते चित्रीत, तब्बल 21 वर्षांनंतर मलायकाने सांगितले खास किस्से

तर अशा रितीने ‘छैंय्या छैंय्या’ गाणे झाले होते चित्रीत, तब्बल 21 वर्षांनंतर मलायकाने सांगितले खास किस्से

googlenewsNext

करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस आणि भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तारने या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून त्यांच्यातील खेळीमेळीचे नाते आणि सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिप्पण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची डबल ट्रीट मिळणार आहे. कारण या भागात छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा ही करीना कपूर-खानच्या जागी परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. 


सर्वच स्पर्धकांनी  मलायकाला इम्प्रेस करण्यासाठी  उत्कृष्ट नृत्ये सादर केली, तरी किंग्ज स्क्वाडने मलायकाच्या छैंय्या छैंय्या या गाण्यावर केलेल्या डान्सने मलायका अतिशय भारावून गेली. परफॉर्मन्सवेळी अनेकांच्या या गाण्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळचे काही किस्से मलायकाने सर्वांना सांगितले.


मलायका अरोरा म्हणाली, “कोणीही कधीही छैंय्या छैंय्या हे गाणं गायलं की मी जुन्या आठवणींमध्ये  हरवून जाते. मला या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळच्या सर्व गोष्टी आठवतात. या गाण्याचं चित्रीकरण कसं केलं, तिथपासून ते मी किती वेळा ट्रेनच्या छतावर पडले होते, तिथपर्यंत सर्व गोष्टी मला चांगल्याच आठवतात. मी छैंय्या छैंय्या हे गाणं कधीच विसरणार नाही कारण मोठ्या पडद्यावर एका गाण्यावर मी पहिल्यांदाच डान्स केला होता. 
त्यावेळी तिथे शाहरूख खान, मणिरत्नम, संतोष सिवन यासारखे सुपरस्टार होते. त्यावेळी मी स्वत:ला इतकी छोटी समजत होते कारण तोपर्यंत या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही मिळवलं होतं. पण तरीही त्या सर्वांनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्या सारखाच मान दिला. मी एक अगदी नवोदित असून मी प्रथमच काही तरी करण्यासाठी घराबाहेर पडले आहे, असं त्यांनी मला एक क्षणही वाटू दिलं नाही. त्या सर्वांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की मला माझ्या घरच्यांची एकदाही आठवण आली नाही.”


आपले पहिलेच गाणे चालत्या ट्रेनच्या छतावर चित्रीत करण्यातील आव्हानांबद्दल बोलताना तिने संगितले, “या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना मी अनेकदा खाली पडले. जोरदार वार्‍्यामुळे मी सतत डावीकडे आणि उजवीकडे हलत असे त्यामुळे त्या टीमने माझ्या घागर्‍्यातून कमरेला एक दोर बांधला. त्यामुळे मला ट्रेनच्या वेगाशी जुळवून घेता येऊ लागलं. 


दुर्दैवाने मी नंतर जेव्हा हा दोर सोडला, तेव्हा हा दोर माझ्या कमरेत घुसला होता आणि त्यातून रक्त येऊ लागलं. ते पाहिल्यावर सर्वजण घाबरले. पण याचमुळे मला जाणवलं की हे सर्व सहकारी आणि कलाकार माझी किती काळजी घेत होते. त्यांनी माझी उत्तम काळजी घेतली- कोणी माझे पाय चेपत होतं, तर कोणी मला खायला आणून देत होतं. काहीजण मला काळजी न करण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत होते. या गोष्टी मी कधीच विसरणार नाही कारण ते सर्वजण माझे कुटुंबीयच होते. ही आठवण मी अखेरपर्यंत लक्षात ठेवेन.”


याशिवाय या भागात प्रेक्षकांना वर्ल्ड डान्स चॅम्पियन्सचा किताब मिळविलेली किंग्ज स्क्वाड ही टीम बोलो हर हर या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळेल. एक स्पर्धक मानसी धृवने ऑन्टीजी  या गाण्यावर जबरदस्त नृत्य करून सर्वांवर प्रभाव टाकला. इतका की परीक्षक मलायका अरोरा आणि बॉस्को मार्टिस यांनीही व्यासपिठावर येऊन तिच्याबरोबर या गाण्यावर नृत्य केले.
 

Web Title: Malaika Arora spills the beans on her iconic song Chaiya Chaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.