Join us

"माणूस निघून जातो खरा पण...", अश्विनी महांगडेची भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:08 AM

Ashwini Mahangde : अश्विनी महांगडेने भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मध्ये अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) घराघरात लोकप्रिय झाली. तिला या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अश्विनीचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. दरम्यान आता तिने भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेने भाऊ मंगेश जगदाळेसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, माणूस निघून जातो खरा पण त्याच्या आठवणी कधी त्रास देतात तर कधी खुदकन हसवतात.. आपण केलेली अनेक कामं आणि आपल्या गप्पा या सगळ्यात तुला समजून घेता आलेच नाही. तुला वेळ देता आलाच नाही ही सल कायम आहे. मंगा तुझी आठवण येते. हॅप्पी बर्थडे भाई.

वर्कफ्रंट...अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’ या नाटकात काम केले आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत ‘मनाली’ची भूमिका तिने केली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय तिने बॉईज, टपाल, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका