Join us

'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेच्या लग्नापेक्षा तिच्या एक नाही तर तब्बल चार मंगळसूत्रांची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:02 IST

Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रतीक शाह यांनी १८ मे रोजी मुंबईत गुपचुप लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अभिनेता प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी १८ मे रोजी मुंबईत गुपचुप लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नांची मराठी इंडस्ट्रीत खूप चर्चा झाली आणि चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकताही होती. अखेर पारंपारिक पद्धतीत लग्न करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोंसोबतच सध्या आणखी एका गोष्टीची चर्चा होते आहे ती म्हणजे नववधू हृताच्या मंगळसूत्राची... 

हृताने तिच्या लग्नाला एक नाही तर चार मंगळसूत्र घातली होती. पहिलं मंगळसूत्र म्हणजे लग्नात प्रतीकने हृताच्या गळ्यात विधीनिशी घातलेले मंगळसूत्र... दोन वाट्यांच्या डिझाईनचं पारंपरिक पद्धतीचं तिचं हे मंगळसूत्र आहे. लग्नात या दोन वाट्यांमध्ये हळदी-कुंकू भरून प्रतीक ते हृताच्या गळ्यात घालताना दिसून आला. तर दुसरे मंगळसूत्र म्हणजे हृताचे छोटं मंगळसूत्र...  हृताचं छोटं मंगळसूत्र हेही पारंपारिक पद्धतीचं आहे. हृताच्या छोट्या मंगळसूत्रात एक छोटी वाटी दिसून येते आहे.

हृताचं तिसरं मंगळसूत्र म्हणजे तिचा मुहुर्तमणी काळ्या मण्यांनी भरलेला आणि मधोमध एक छोटा सोन्याचा मणी... लग्नांच्या फोटोंमध्ये हृताचा मुहुर्तमणी खूप उठून आणि शोभून दिसतोय. याशिवाय तिचे चौथं मंगळसूत्र तिच्या गळ्यातले आणखी एक छोटं मंगळसूत्र.., पण हे दुसरं छोटं मंगळसूत्र डायमंडचं आहे. काळेमणी आणि मध्ये सिंगल डायमंड असं तिचं हे क्युट मंगळसूत्र आहे. हे चारही मंगळसूत्र ऋताने तिच्या लग्नाला परिधान केले होते. ऋता या सगळ्या मंगळसूत्रांमध्ये खूपच सुंदर दिसत होती. 

हृता आणि प्रतीकने १८ मे रोजी गुपचूप लग्न केले. त्यांचा हा विवाह सोहळा अगदी थाटामाटात आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. सकाळी मराठमोळ्या पद्धतीत त्यांचे लग्न पार पडले तर संध्याकाळी रिसेप्शन सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

टॅग्स :ऋता दूर्गुळे