Join us

'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेनं शेअर केलेली ती पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:47 IST

Hruta Durgule:लग्नानंतर आता हृता पुन्हा बॅक टु रुटीन आली असून तिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. लग्नानंतर ती नुकतीच तिचा पती प्रतीक शाहसोबत हनिमूनला इंस्तांबूल टर्कीची सफर करून आली. हृता आता पुन्हा बॅक टु रुटीन आली असून तिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

हृता दुर्गुळे हिने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत ती दिसते आहे आणि दुसरा फोटो लग्नातील आहे. हे फोटो शेअर करत हृताने लिहिले की, कामावर परत रुजू झाले. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्व मेसेज करत आहात आणि प्रेमाचा वर्षाव करत आहात, त्यासाठी मी नेहमी तुमची कृतज्ञ राहीन. माझ्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. याबद्दल लवकरच सांगणार आहे.  माझ्या कामाची सुरुवात चित्रपटाच्या टीझरने करत आहे.  खूप वेळ वाट पाहिली आहे! पण नेहमी म्हटल्याप्रमाणे चांगल्या गोष्टींना वेळ लागतो आणि ती प्रतीक्षा तुम्हाला आणखी मोलाची शिकवण देते. अनन्यासाठी जे काही आहे त्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या प्रवासात जेव्हा माझी सर्वात आवडती व्यक्ती माझ्यासोबत असते! प्रतीक शाह. मला अजून काय हवे आहे! त्यासाठी मी खूप आभारी आहे.

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांनी १८ मे रोजी लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाचा विशेष गाजावाजा न करता अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिचे विवाह सोहळा पार पडले. हनिमूनवरून परत आल्यावर हृता आता नव्या जोशात कामाला लागली आहे. तिचा जुलै महिन्यात 'अनन्या' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे