Join us

मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा...! ‘शितली’ आणि ‘इंद्रा’ घेऊन येत आहेत नवी लव्हस्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:43 IST

Shivani Baokar, Ajinkya Raut : होय, शिवानी बावकर आणि अजिंक्य राऊत ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 

‘लागीर झालं जी’  (Lagir Zal Ji) ही मालिका कधीच संपली. पण या मालिकेतील शितलीला प्रेक्षक अद्यापही विसरू शकलेले नाहीत. आम्ही बोलतोय ते शितलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar)  हिच्याबद्दल. होय, शिवानीनं साकारलेल्या शितलीनं सगळ्यांना वेड लावलं होतं. आता ही शितली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एकटी नाही तर तिच्यासोबत दिसणार आहे तो ‘मन उडू उडू झालं’  (Man Udu Udu Zal) फेम इंद्रा अर्थात इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत. होय, शिवानी बावकर आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 

अजिंक्य राऊत आणि शिवानी बावकर ही फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हे दोघे मालिका नव्हे तर एका व्हिडीओ अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘नाते नव्याने’ या अल्बममध्ये ही नवी जोडी दिसणार आहे. मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा अशी या अल्बमची टॅगलाईन आहे.  

सध्या झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका तुफान लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे. या मालिकेत इंद्राची भूमिका साकारुन अभिनेता अजिंक्य राऊत प्रचंड चर्चेत आला आहे.  

शिवानी बावकर बद्दल सांगायचं तर ‘लागीरं झालं जी’ या मालिकेनंतर ती ‘कुसूम’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर  शिवानी बावकर रुपेरी पडद्यावर झळकली.  ‘गुल्हर’ या मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.  

टॅग्स :शिवानी बावकरलागिरं झालं जी