Join us

मनीष पॉलच्या शूजची फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:57 IST

मनीषने ठरविले आहे की प्रत्येक भागात तो विशिष्ट आणि आगळे वेगळे बूट घालणार आहे. त्याच्याकडे 150 पेक्षा अधिक जोडी बूट आहेत.

ठळक मुद्देमनीष घालणार प्रत्येक भागात नवीन शूज

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनमध्ये संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी असणार आहे कारण इंडियन आयडॉल 10 सिंगिंग रिएलिटी शोमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गायक स्पर्धेत उतरणार आहेत. या कार्यक्रमात उत्कृष्ट गायक अन्नू मलिक, विशाल दादलानी आणि नेहा कक्कर या परीक्षकांची जबरदस्त पॅनेलसोबत सूत्रसंचालक मनीष पॉल सहभागी झाले आहेत. मनीष स्वतःची खास विनोद शैलीने सर्वांना पोट धरधरून हसवतो. मनीषने ठरविले आहे की प्रत्येक भागात तो विशिष्ट आणि आगळे वेगळे बूट घालणार आहे. त्याच्याकडे 150 पेक्षा अधिक जोडी बूट आहेत आणि आपल्या पोषाखावर कोणते बूट अधिक शोभून दिसतील हे नक्की करण्यासाठी तो रोज सकाळी एक तास घालवतो.

मनीष पॉलला त्याच्या या सत्रातील स्टाइलबद्दल विचारले असता, तो म्हणाला, होय, नक्कीच! मला स्वतःचाच शोध घेत राहायला आवडते. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक भागात काही तरी नवीन बघायला मिळेल. मला स्टायलिश कपडे आणि शूज घालायला आवडतात. मला फॅशन करायला आवडते. प्रत्येक भागात प्रेक्षक मला माझ्या फॅशनेबल रूपात पाहतील. तसेच, लोक नेहमी मी कोणते शूज घालतो, त्याची आतुरतेने वाट बघत असतात. त्यामुळे, ते लोकांना नक्कीच बघायला मिळेल. आणि हो, मी प्रत्येक भागात नवीन शूज घालणार आहे. माझा ट्रेंडी लुक आणि उत्कृष्ट गायक यांच्यामुळे इंडियन आयडॉल 10 मधील मनोरंजनाचा स्तर नक्कीच उंचावणार आहे. सोनी एण्टरटेन्मेंट वाहिनीवर इंडियन आयडॉल 10 प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता पाहायला मिळेल.

टॅग्स :मनीष पॉल