झी मराठीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत नुकतेच दिपू आणि इंद्राचे लग्न झाले आहे. सानिका आणि कार्तिकला वठणीवर आणल्यानंतर ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. या मालिकेने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. नयन कानविंदेची भूमिका अभिनेता अमित परब(Amit Parab)ने साकारले होते. अमित परबच्या आईचे २० जुलै २०२२ रोजी निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
अमित परबने इंस्टाग्रामवर आईसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचे नुकसान नेहमीच दुःखद आणि पोकळी भरून न येणारी असते. तू दिलेले विचार माझ्यात कायमच राहतील. तू मला गेल्या २८ वर्षात शिकवलेल्या मूल्ये आणि नितीमत्तेमुळे. तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसे व्हायला शिकवले आहेस. हे सगळे सोप्पे होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुझ्यासाठी दुसर्या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे. ते माझ्यासाठी स्वार्थाचे ठरले असते जर मी तुला तुझ्या भल्यासाठी जाऊ दिले नसते.