झी मराठी(zee Marathi)वरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली पण मालिकेत मात्र त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे आले आणि त्यांच्या प्रेमाला विरोध देखील झाला. त्यामुळे दिपू आणि इंद्रा एकत्र कधी येणार प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर इंद्रा आणि दिपू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
मन उडू उडू झालं मालिकेत इंद्रा आणि दिपूच प्रेम देशपांडे सरांनी मान्य केले. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत इंद्रा आणि दीपिका यांचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम पाहीला. ज्यामध्ये देशपांडे सर इंद्राला 'जावई' असं म्हणतात. या कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात निळ्या साडीमध्ये दीपिकाच सौंदर्य इतकं खुलून येत कि इंद्राला तिच्यावरून नजर हटवणे कठीण होतं. देशपांडे सरांच्या परवानगी नंतर आता इंद्रा आणि दिपूच्या लग्नाचा बार उडणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांचा विवाह सोहळा प्रेक्षक लवकरच मालिकेत पाहू शकणार आहेत.
येत्या काही दिवसात मन उडू उडू झालं मालिका निरोप घेणार असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतून कानविंदे कुटुंबातील नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे यांची मालिकेतून एक्झिट करण्यात आली. या तिघांच्या पाठोपाठ बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर यांनीदेखील मालिकेतून निरोप घेतला आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आल्याचे समजते आहे. या मालिकेचा शेवटचा भाग १३ किंवा १४ ऑगस्टला प्रसारीत होणार आहे.