Join us

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे कोण होणार करोडपतीच्या मंचावर लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:17 IST

मनोज बाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही सांगितलं आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे 'कोण होणार करोडपती' - कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत.कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे या भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

 

सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटक सृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार अभियानयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या असून आगामी काळातही वैविध्य भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन करताना दिसतील.

 

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. रामगोपाल वर्मा यांचा 'शूल' चित्रपट आजही अनेकांच्या आठवणीत असेल. या सिनेमातील नायक मनोज बाजपेयी आणि खलनायक सयाजी शिंदे यांचे पात्र कुणीच विसरू शकलेले नाही. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.मनोज बाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत. मनोज बाजपेयींनी हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज बाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही सांगितलं आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा आगामी भाग नक्कीच रसिकांच्याही पसंतीस पात्र ठरेल.

टॅग्स :सयाजी शिंदेमनोज वाजपेयी