Join us

‘काळभैरव रहस्य-2’मध्ये मनोज वर्मा साकारणार आव्हानात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 16:40 IST

चक्रवर्ती अशोक सम्राट आणि महाराणा प्रताप यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला ज्येष्ठ अभिनेता मनोज वर्मा आता ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत एक आव्हानात्मक भूमिका रंगविताना दिसल.

चक्रवर्ती अशोक सम्राट आणि महाराणा प्रताप यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला ज्येष्ठ अभिनेता मनोज वर्मा आता ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत एक आव्हानात्मक भूमिका रंगविताना दिसल.

‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत मनोज राजा विक्रमसिंहाची भूमिका रंगविणार असून त्याने काळभैरवाच्या मंदिरातच एका मुलीवर बलात्कार केलेला असतो. ही मुलगी काळभैरवाची भक्त असते आणि ती त्या राजाला शाप देते. या शापामुळेच या शाही घराण्यातील पुरुष तरुणपणीच मरण पावत असतात. या मालिकेतील प्रवेशाचा आपला अनुभव सांगताना मनोज म्हणाला, “मला नेहमी गंभीर आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा रंगवायला आवडतात. मालिकेच्या कथानकाचा साचा निश्चित करणार्‍्या व्यक्तिरेखा मला आवडतात. ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत राजा विक्रमसिंहाची भूमिका साकारण्यास मी उत्सुक बनलो असून तिची कथा मनाची पकड घेणारी आहे. प्रेक्षकांना माझी व्यक्तिरेखा पाहायला आवडेल.” 

‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. या मालिकेत आयम हा राजगुरूची भूमिका साकारणार असून तो काळभैरव मंदिराचा पुजारी आहे. एका नव्या टप्प्याचा प्रारंभ करण्यास सिद्ध झालेला आयम या नव्या भूमिकेत अचूक शोभून दिसतो.  

टॅग्स :काल भैरव रहस्य २