Join us

Aastad Kale 'राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:26 AM

Aastad kale: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आस्तादने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षात बंड केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं. एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनीही पाठिंबा दिला. ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सध्या या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. यात केदार शिंदे (kedar shinde), आरोह वेलणकर(aroh welankar), प्रकाश राज (prakash raaj) यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर त्याचं मत मांडलं आहे. यामध्येच आता अभिनेता आस्ताद काळे (aastad kale) यानेही फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

कलाविश्वात सक्रीय असेलला आस्ताद सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर तो उघडपणे भाष्य करत असतो. यावेळीदेखील त्याने राजकीय स्तरावर सुरु असलेल्या घडामोडींवर त्याचं मत मांडलं आहे. 

काय म्हणाला आस्ताद?

“महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण…..”, असं म्हणत आस्तादने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. आस्तादची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्याच्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पडदा पाडला. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे ज्या संयमाने आणि धीराने भाष्य करत होते त्याचं सर्वस्तरांमधून कौतुक होत आहे. 'उद्धव ठाकरे नेहमी आमच्या मनात राहतील. महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात आजवरचा सर्वात संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री पाहिला', असं म्हणत नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षअस्ताद काळेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे