छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या शोमुळे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव या कलाकारांच्या चाहत्यांमध्ये भर पडली. तर गौरव मोरे, दत्तू मोरे, शिवाली परब, पृथ्विक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर हे नवे चेहरे घराघरात पोहोचले. हास्यजत्रेतील सगळेच विनोदवीर अफलातून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात.
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही वेळ विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा या शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचा चाहता आहे. हास्यजत्रेच्या नवीन शोचा प्रोमो अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या स्टोरीला त्याने “ते परत येतायत” असं कॅप्शन दिलं आहे.
तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...”
प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम १४ ऑगस्टपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या नवीन भागाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्राजक्ताने नुकताच हास्यजत्रेच्या सेटवरील व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत.
“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कलाकारांचा नुकताच अमेरिका दौरा पार पडला. हास्यजत्रेच्या विनोदवीरांना अमेरिकेतही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अमेरिकेत हास्यजत्रेचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले.