Akshay Kelkar Video: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शूर योद्धे, शककर्ते, कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूका काढण्यात येतात. अशा पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, आज शिवजयंती निमित्ताने मराठमोळ्या अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. अक्षयने कागदावर सुंदररित्या छत्रपती शिवरायांचे खास चित्र रेखाटले आहे.
सुरुवातीला व्हिडीओमध्ये अभिनेता एक पांढऱ्या कागदावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटत आहे. त्यानंतर रंगांच्या मदतीने चित्र पूर्णपणे तयार करतो. अक्षयने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत त्याला "जय भवानी जय शिवाजी...", असं कॅप्शन दिलं आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त त्यांनी रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. शिवाय त्याच्या अनेक चाहते महाराजांचे चित्र पाहून यामुळे प्रभावित झाले आहेत. शिवाय त्यांनी अक्षयचे कौतुक देखील केले आहे.
वर्कफ्रंट
अक्षय केळरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. अक्षय हा उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम चित्रकारही आहे. 'बिग बॉस मराठी ४'चा अक्षय विजेताही होता. अलिकडेच तो 'अबीर गुलाल' मालिकेत दिसला होता.