Akshay Kelkar: अक्षय केळकर (Akshay Kelkar) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय या पर्वाचा तो विजेता देखील ठरला. अलिकडेच अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. अशातच अक्षयने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
अक्षय केळकरने सोशल सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "आपण सोशल मीडियावर बंधन घालणं अत्यंत गरजेचं आहे. दर २-३ रिलनंतर एक सॉफ्ट पॉर्न असल्यासारखं रिल पॉप अप होत... अख्या जगासमोर कपडे बदलणे, Clevage दाखवणे... किंवा मुला-मुलींकडून कंटेट या नावाखाली काहीही विचित्र चाळे आणि फॉलोअर्ससाठीची विकृत मेहनत यात असते. सतत उत्तेजित व्हा हे सांगणारा सोशल मीडिया झाला आहे. "
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "खरंतर सोशल मीडिया आजच्या काळात महत्वाचं माध्यम आहे. पण, तरीही खूप घातक ठरतोय. सिनेमा पूरता अॅडल्टचा टॅग लावायचा आणि या मीडियावरच्या बंधनाचं काय?" असं म्हणत अक्षयने प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.
दरम्यान, अक्षय केळकर 'कलर्स मराठी' वाहिनीवर 'अबीर गुलाल' या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.