Join us

Anand Abhyankar : तुझ्याशिवाय आम्ही..., अपघातात निधन झालेले अभिनेते आनंद अभ्यंकरांच्या लेकीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 5:27 PM

Anand Abhyankar 10th Death Anniversary : ज्येष्ठ टीव्ही आणि चित्रपट अभिनेते आनंद अभ्यंकर आज आपल्यात नाहीत.  10 वर्षांपूर्वी कार अपघातात त्यांचं निधन झालं.

Anand Abhyankar 10th Death Anniversary :  ज्येष्ठ टीव्ही आणि चित्रपट अभिनेते आनंद अभ्यंकर आज आपल्यात नाहीत.  10 वर्षांपूर्वी कार अपघातात त्यांचं निधन झालं. आनंद मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करत असताना 23 डिसेंबर 2012 रोजी एका टेम्पोने त्याच्या कारला धडक दिली आणि यातच आनंद यांचं निधन झालं.  असंभव, मला सासू हवी सारख्या मालिकेतून आनंद अभ्यंकर घराघरात पोहाचले. अनेक हिंदी मालिकाही त्यांनी गाजवल्या. ‘मला सासू हवी’ ही  त्यांची शेवटची मालिका ठरली. आनंद अंभ्यकर यांच्या निधनाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. वडिलांच्या 10 व्या स्मृतीदिनी त्यांची लेक सानिकानं एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.  काही वर्षांपूर्वी सानिकाचं लग्न झालं. तिला गोंडस मुलगी आहे.  

सानिका लिहिते... ‘बाबा तुझ्याशिवाय 10 वर्ष ही अतिवास्तव वाटतात. तू आमच्यासोबत आहेस, आमच्या हृदयात आणि मनात, आमच्या बोलण्यात आणि शांततेत आहेस... तू आम्हाला कायम प्रेरणा देत असतोस. तुझ्याशिवाय आमचं आयुष्य कसं घडलं याचा तुला नक्कीच अभिमान वाटेल...पण एक गोष्ट कायम बोचते, ती म्हणजे तू किती चांगला आजोबा झाला असतास, हे आम्ही पाहू शकलो नाही. पण मला खात्री आहे की तू एरिशाला (सानिकाची मुलगी)बिघडवलं असतं. तिची मोठी होण्याची आणि तुझे आजोबा कसे होते, हे तिला सांगण्याची आणखी प्रतीक्षा करवत नाही. ददरोज तुझी आठवण येते पण तुझा वारसा कायम आहे. आपण परत भेटेपर्यंत प्रेम..., असं सानिकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आनंद अभ्यंकरांची मुलगी सानिका हिनं कथ्थक नृत्यात विशारद केलं आहे. तर मुलगा निरज  मॉडेलिंग आणि डान्स मध्ये करिअर करत आहे. सानिकाचं लग्न झालं असून तिला एरिशा ही मुलगी आहे.

टॅग्स :मराठी अभिनेता