Join us

रंगभूमी गाजवायला भाऊ कदम-ओंकार भोजने सज्ज; “करून गेलो गांव” पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 7:50 PM

Karun gelo gava: राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत.

मालवणी भाषेतला गोडवा आजही रसिकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आज १० वर्ष झाल्यानंतरही करुन गेलो गांव या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. नाट्य रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर (mahesh manjarekar) यांनी दहा वर्षापूर्वी हे नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. हे नाटक तेव्हा तुफान गाजलं होतं. म्हणूनच, आता पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे.

अद्वैत थिएटर्स व अश्वमी थिएटर्स निर्मित या नाटकातील हुकमी एक्का भाऊ कदम (bhau kadam) प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे चला हवा येऊ द्या सोबतच आता ते रंगमंचावरही वावरणार आहेत. तसंच त्यांच्यासोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून विनोदाच्या अफलातून टायमिंगनं सर्वांना हसवणारा कोकण कोहिनूर अर्थात अभिनेता ओंकार भोजने (omkar bhojane) आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. 

राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत.  या नाटकाच्या निमित्तानं विनोदवीरांची एक नवी आणि अनोखी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ओंकार भोजने आणि भाऊ कदमबरोबरच या नाटकात अभिनेत्री उषा साटम, नुपूर दूदवडकर, प्रणव जोशी, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर हे कलाकार देखील आहेत.  

टॅग्स :नाटकभाऊ कदममहेश मांजरेकर सेलिब्रिटी