Join us

तब्बल १५ वर्षांनी या लोकप्रिय अभिनेत्याचं स्टार प्रवाहवरील मालिकेत कमबॅक, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 4:03 PM

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेतून कमबॅक करणार आहे

स्टार प्रवाहवरील अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'पुढचं पाऊल', 'देवयानी', 'अग्निहोत्र' या मालिकांनी स्टार प्रवाहचा एक काळ गाजवला आहे. सध्या सुरु असलेल्या 'आई कुठे काय करते', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकांनीही प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. स्टार प्रवाहवरील याच  मालिकांमध्ये लोकप्रिय अभिनेता तब्बल १५ वर्षांनी कमबॅक करतोय. हा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर.

चिन्मय मांडलेकर या मालिकेतून १५ वर्षांनी दिसणार

चिन्मय मांडलेकरने त्याच्या सोशल मीडियावर ही खास माहिती त्याच्या चाहत्यांनी दिलीय. चिन्मय मांडलेकर 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेच्या माध्यमातून १५ वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक करत आहे. तुम्हाला वाटलं असेल की, चिन्मय या मालिकेत अभिनय करणार तर तसं नाही. चिन्मय या मालिकेच्या लेखनाची धुरा सांभाळणार आहे. मालिकेचा प्रोमो पोस्ट करुन चिन्मय लिहितो, "जवळ जवळ पंधरा वर्षांनी स्टार प्रवाहसाठी मलिका लिहितोय. तुम्हाला आवडेल अशी आशा!"

चिन्मयच्या नवीन मालिकेविषयी

मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका देखील अश्याच एका जोडप्याभोवती फिरते. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश जाधव या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. आता चिन्मय ही मालिका लिहित असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनचिन्मय मांडलेकरनिवेदिता सराफ