Join us  

"मला आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी..."; सूरजवर पोस्ट करुन ट्रोल झालेल्या अभिनेत्याने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:24 PM

अभिनेता कपिल होनरावने सूरज चव्हाण जिंकल्यावर एक पोस्ट केल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता कपिलने आणखी एक पोस्ट करुन खुलासा केलाय

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता झाला. सूरज विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अभिनंदन केलं. परंतु अभिनेता कपिल होनरावने सूरज विजयी झाल्यानंतर पोस्ट केल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता कपिलने नवीन पोस्ट करुन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय. कपिल लिहितो, "God bless you all of you... आई अंबा बाई तुम्हाला बुद्धी देवो.. माझ्या पोस्ट मागची भावना तुम्हाला समजली नाही.. मला आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्यांनी आधी मी काय बोलोय हे नीट वाचा.. मी बैलाचा रोल केलाय, माझं थोबाड नीट नाही, मला आता कोण साइड रोल पण देणार नाही हे सगळं ठीक आहे आधी मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या.. मग शिव्या द्या...."

कपिल पुढे लिहितो, "मी कधी ही सूरज #non-deserving आहे. तो कसा जिंकला त्याने जिंकू नये अस कधीच नाही बोलोय.. ना कधी त्याच्या रीलवर, वा त्याच्या कंटेंटवर वाईट बोललोय.... आणि सूरज वर जळण्याचा प्रश्नच येत नाही.. ना मी बिग बॉसमध्ये होतो.. ना सूरज माझा काँपिटेटर आहे... तो जे करतो ते मी ठरवलं तरी उभ्या आयुषात कधी करू शकणार नाही....थियेटर, बॅक स्टेज, एकांकिका , टीव्ही करून मी इथे पर्यंत आलोय.. जे काही छोटंस यश मिळाल .. हे त्याचमुळे.. आज ही संघर्ष करतोय.. कुठे तरी मुख्य भूमिका मिळावी म्हणून... पण कुठे तरी मी कमी पडत असेल.. मी अजून तितका चांगला अभिनेता नसेन...किंवा ते माझ्या नशिबात नसेल...पण ह्यात सूरजला कुठेही मी कमी लेखत नाही."

कपिल होनराव पुढे म्हणाला, "त्या बिचाऱ्याने.. खूप वाईट दिवस पाहिलेत .. त्याच ही संघर्ष आहे...आणि आज त्याला जे काही मिळाल आहे त्याच्या मेहनतीने , साधेपणा मुळे मिळालं आहे. सूरज ह्या 70 दिवसा पूर्वी पण होता... आणि फेमस होता.. पण कलर्स मराठीने एक संधी दिली.. त्याला बिग बॉसमध्ये घेऊन आले.. त्याला थोडं फार groom केलं... आणि आज हे ..जे काही मिळाल आहे त्याला ..भव्यदिव्य.. स्वप्नवत .. त्याच्या नशिबाने.. ह्या फिल्डमध्ये नशीब खूप मोठा रोल प्ले करतं .. हे बोलायच होतं मला.... ज्यांनी छान कमेंट करून सपोर्ट केला त्यांना मनापासून धन्यवाद.. आणि बाकीच्यांना God bless you...."

काय म्हणाला होता कपिल?

कपिलने सूरज विजयी झाल्यावर पोस्ट लिहिली होती की, "१० वर्ष प्रयोगिक थेटर, ३-५ वर्ष टॉपची सीरियल करून . स्वतः ला अभिनेता म्हणून सिद्ध करून.... सिक्स पॅक abs, अभिनयावर काम करून .. इतके रोज ऑडिशन देतोय.. एक लीड चा ऑडिशन क्रॅक नाही होत.. पण हा झापुक झुपुक बोलून.. बिग बॉसची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव.... खूप खूप अभिनंदन सुरज... झापुक झुपुक शुभेच्छा... गोलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा."

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठीकलर्स मराठी