Join us

 Kiran Mane : ‘-अन् असे बनतात चविष्ट संजय राऊत...’; किरण मानेंनी सांगितली ‘रेसिपी’, फेसबुक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 10:31 AM

 Kiran Mane on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

 Kiran Mane on Sanjay Raut : अभिनेते किरण माने  (Kiran Mane) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्या बेधडक पोस्ट सतत चर्चेत असतात. अनेक राजकीय, सामाजिक मुद्यांवर ते परखडपणे व्यक्त होतात. सध्या त्यांची राजकीय पोस्ट चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे आणि सध्या ती चांगलीच व्हायरल होतेय.  

 असे तयार होतात ‘संजय राऊत’...

‘साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई - दोघांपैकी जे हाताशी असेल ते... वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !’, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.किरण माने यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘तीन पाकळ्या राणेंना टाकलं नाही म्हणून जाहिर निषेध,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ओ बाब्बो, ही कोणती डिश? असा प्रश्न एका युजरने केला आहे. ‘ही रेसिपी तयार होऊन टेस्टिंगला कुणाला द्यायची आणि पूर्ण खायला कुणाला ठेवायची, हे कळलं तर बरं,’ अशी कमेंट एकाने केली आहे. काटा किर्रर्रर्रर्र, रेसिपी एकदम ओक्के हाय, कडक, लय भारी, अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत. एका युजरने मात्र किरण मानेंच्या या पोस्टवर आक्षेप घेतला. यावर विनोद म्हणून घ्या. संजय राऊत साहेबही हे वाचून हसताहेत, असं सूत्रांनी मला सांगितलं, अशी कमेंट किरण माने यांनी केली आहे. 

राजकारणी लोकं लै वांड...!

तीन दिवसांआधी किरण माने यांनी अशीच एक राजकीय पोस्ट शेअर केली होती. ‘भाजपानं शब्द फिरवल्यावर शिवसेनेनं कोलांटउडी मारून मुख्यमंत्रीपद मिळवलं. राष्ट्रवादी-काँग्रेसला सत्ता मिळणारच नव्हती. ती त्यांनी तब्बल अडीच वर्ष रेटून भोगली. दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे ‘जॅकपॉट’ लागल्यागत दिलं. या सगळ्यात ज्यांची मुख्यमंत्रीपदासाठी तडफड चालली होती, ते बिचारे निरूपयोगी पदावर बसवले, डांबरट राजकारणी,’असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यांनी ती पोस्टही तुफान व्हायरल झाली होती.

 

टॅग्स :किरण मानेसंजय राऊतशिवसेनामहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष